डेहराडून येथे पहिली कनिष्ठ राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धा

Leave a comment

June 9, 2017 by pickleball times

IMG-20170609-WA0001अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्यावतीने पहिली कनिष्ठ राष्ट्रीय पिकलबॉल अजिंक्यपद स्पर्धा येत्या 9 ते 11 जूनदरम्यान डेहराडून  (उत्तराखंड) येथील परेड ग्राउण्डवर आयोजित करण्यात आली आहे. अठरा वर्षांखालील मुले-मुलींची ही स्पर्धा असणार असून तिच्यात महाराष्ट्राचे दहा खेळाडू सहभागी हातील, अशी माहिती राज्य पिकलबॉल संघटनेचे सचिव शैलेश गवळी यांनी दिली.

सलग चार वर्षांपासून वरिष्ठ खेळाडुंच्या राष्ट्रीय स्पर्धा घेणाऱ्या ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन अर्थात ‘आयपा’ यंदा प्रथमच अठरा वर्षांखालील खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धा घेत आहे. सुमारे पंधरा राज्यांचे मुला-मुलींचे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे : साक्षी बाविस्कर, ऋतुजा कालिके, अदिती जगताप, सलोनी देवडा, निशा बरेला, यश पाटील, कृष्णा मंत्री, अजय चौधरी, मयूर पाटील, कुलदीप महाजन

महाराष्ट्र संघ निवडीसाठी अहमदनगर येथे नुकतीच एक स्पर्धा घेण्यात आली, ज्यात बारा जिल्ह्यांमधील खेळाडुंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडुंचा समावेश राज्याच्या संघात करण्यात आला, असंही गवळी यांनी सांगितलं आहे.

18489629_10208130941545966_5693881846085553604_o(1)फेडरेशन कप

कनिष्ठ राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेबरोबरच ‘फेडरेशन कप’ ही मर्यादित स्पर्धाही डेहराडूनमध्ये ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षी जयपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहचलेल्या वरिष्ठ खेळाडुंना ‘फेडरेशन कप’मध्ये खेळण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती ‘आयपा’चे सरचिटणीस सुनील वालावलकर यांनी सांगितले.

फेडरेशन कपस्पर्धेचे खेळाडू : आशिष महाजन, तेजस महजन, सुनील जोशी, सचिन मांद्रेकर, अतुल एडवर्ड, प्रतिक्षा बावडेकर, जागृती जावरे, करिष्मा कालिके, ऋतुजा कालिके, नताशा बेग

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Visitors

  • 4,906

Categories

Top Clicks

  • None

Social

June 2017
M T W T F S S
« Apr    
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 403 other followers

Social

%d bloggers like this: