जयपुरमध्ये ‘जय महाराष्ट्र’

Leave a comment

December 21, 2016 by Pickleball Times

तीन सुवर्ण, एक रजत आणि एक कास्यं पदकांची कमाई करत महाराष्ट्राने चौथ्या राष्ट्रीय वरिष्ठ पिकलबॉल स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सलग दुसऱ्या वर्षी पटकावले. गुलाबी शहर जयपूरमधील आंतराराष्ट्रीय दर्जाच्या सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा 12 व 13 नोव्हेंबर 2016 रोजी पार पडली. यजमान राजस्थान दुसऱ्या स्थानावर राहिला.

केवळ देशाचेच नव्हे तर अमेरिकेसह अनेक देशांमधल्या पिकलबॉल प्रेमींचे लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिले होते. कारण अमेरिकेत जन्मलेला पिकलबॉल हा खेळ अनेक देशांमध्ये लोकप्रिय होत असून त्यात भारत हा देश आघाडीवर आहे.

11 राज्यांच्या 150 हून अधिक खेळाडुंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. केरळ, उत्तराखंड आणि सिक्कीम या तीन राज्यांचा या स्पर्धेत प्रथमच झालेला सहभाग आणि पश्चिम बंगाल व तामिळनाडू या दोन राज्यांनी पिकलबॉल सुरु करण्यात दाखवलेला रस, ही या स्पर्धेची ठळक वैशिष्ठ्ये.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियमच्या वुडन कोर्टवर पुरुष, महिला आणि मिश्र गटातले सामने पार पडले. दुसरा दिवस गाजला तो उपांत्य आणि अंतिम सामन्यांनी.

राजस्थानचा निखील सिंग राजपूत आणि महाराष्ट्राचा अनिकेत दुर्गावले यांच्यात पुरूष एकेरीचा अंतिम सामना रंगला. दोन्ही खेळाडू चांगली तयारी करुन कोर्टवर उतरलेले असल्याने अपेक्षेप्रमाणे हा सामना चुरशीचा झाला. पहिल्या सेटमध्ये निखीलने 11-5 अशी अनिकेतवर मात केली खरी पण दुसऱ्या सेटमध्ये अनिकेतने 11-8 अशी मात करुन स्वतःला खेळात टिकवून ठेवलं. त्यामुळे तिसऱ्या सेट कसा होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. परंतु निखील सिंग राजपूतने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत 11-2 अशा फरकाने तिसरा सेट आणि सामान आपल्या खिशात घातला.

पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. या सामन्यात लढत होती ती महाराष्ट्र आणि यजमान राजस्थान यांच्यात. मनिष राव व भूषण पोतनिस (महाराष्ट्र) विरुद्ध भारत राज शर्मा व प्रशांत कलानी. या सामन्याच्या उत्सुकतेमागे आणखी एक कारण होते ते गतवर्षीच्या सामन्याचं. मनिष आणि भारत राज 2015 च्या पानिपतमधील शिवाजी स्टेडियममध्ये दुहेरीच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी भारत राज व मुख्त्यार अली यांनी मनिष राव व सचिन मांद्रेकर या जोडीवर विजय मिळवला होता.

यंदाच्या अंतिम सामन्यात सुरुवातीलाच प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ होत मनिष व भूषण यांनी पहिला सेट 11-5 अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये राजस्थानचे खेळाडू कमबॅक करतील असं वाटत होतं. पण महाराष्ट्राच्या खेळाडुंनी खेळावरील आपली पकड जराही कमी होऊ दिली नाही. दोन्ही बाजुंनी प्रतिस्पर्ध्यांवर हल्ले-प्रतिहल्ले करण्यात आले खरे, पण महाराष्ट्राच्या मनिष व भूषण यांनी खेळात संयम राखत दुसरा सेटही 11-7 अशा गुण फरकाने खिशात घालून सामना जिंकला.

अंतिम सामन्यापूर्वी झालेला एक उपांत्य सामनाही लक्षात राहील असा झाला. महाराष्ट्राच्या मनिष व भूषण यांच्याविरुद्ध खेळताना बिहारच्या आनंद सिंग व अभय कुमार यांनी उत्कृष्ठ खेळाचं प्रदर्शन केलं. महाराष्ट्राच्या अनुभवी खेळाडुंना बिहारने चांगली लढत दिली.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत बिहारच्या आनंद सिंग व अभय कुमार यांनी पिंक सिटी जयपूरच्या मुख्त्यार अली व अनुराग चौहान यांना मात देत बिहारला कांस्यपदक मिळवून दिले.

 

मध्य प्रदेशच्या शुभी व्यासने आपणच महिला एकेरीची ‘गोल्डन गर्ल’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकत तिने हॅट्रीक साधली. अंतिम सामन्यात तिची गाठ पडली ती राजस्थानच्या रेखा चौधरीशी. रेखाने खूप प्रयत्न केला पण ती शुभीवर वरचढ होऊ शकली नाही. महिला एकेरी गटातल्या कांस्यपदकासाठी प्रतिक्षा बावडेकर आणि जागृती जव्हारे या महाराष्ट्राच्याच दोन खेळाडू एकमेकींविरुद्ध लढल्या, ज्यात प्रतिक्षाने बाजी मारली.

महिला दुहेरीचे सुवर्णपदक महाराष्ट्राच्या करिश्मा व ऋतुजा या कालिका भगिनींनी पटकावलं. यजमान राजस्थानच्या मधुलिका व गरिमा यांच्याशी झालेल्या सामान्यात करिश्मा व ऋतुजा यांनी प्रतिस्पर्ध्यांना सरळ दोन सेटमध्ये पराभूत केलं. दोन्ही सेट 11-2 आणि 11-3 अशा फरकाने जिंकले. मध्य प्रदेशच्या शिवानी सोनी व उर्मिला आझाद या जोडीने कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं.

मिश्र दुहेच्या अंतिम सामान्यातही महाराष्ट्र आणि राजस्थानच एकमेकांसमोर होते. अतुल एडवर्ड व नताशा (महाराष्ट्र) विरुद्ध अश्विनी कुमार वाधवा व कविता शेखावत (राजस्थान). पहिला सेट अतुल व नताशाने 11-1 अशा मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये अश्विनी कुमार व कविताने 11-5 असे गुण मिळवून सामान्यात यजमान अजून खेळात आहेत, हे दाखवून दिले. पण तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडुंनी यजमानांना 11-6 अशा फरकाने नमवले.

 

उद्घाटन अन् समारोप

चौथ्या राष्ट्रीय वरिष्ठ पिकलबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे होते राजस्थान राज्य क्रीडा परिषदेचे सचिव नारायण सिंह. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करत असल्याची त्यांनी घोषणा केली. दरम्यान खेळाडुंशी त्यांनी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला. तसेच 150 विद्यार्थी, सर्व संघटक, पंच आणि स्वयंसेवकांसाठी राजस्थाचा पारंपारिक खाद्यपदार्थ ‘चूरन दाल भाटी’ची व्यवस्थाही त्यांनी केली. ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर, अनिल शर्मा, राजस्थान स्टेट पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष रघुराज सिंग यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

स्पर्धेचा बक्षिस व समारोप समारंभ राजस्थानचे पोलिस महासंचालक रविप्रकाश मेहदरा आणि ओलंपिकपटू श्रीराम सिंग यांच्या हस्ते पार पडला. सुनील वालावलकर, रघुराज सिंग, सुरेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्थानिक आयोजन समितीचे करणसिंग शेखावत आणि नीतू शर्मा यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी प्रयत्न केल्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली.

राहुल वाणी आणि निकिता भुवड यांनी स्पर्धेतले सर्व सामने वेळापत्रकाप्रमाणे खेळवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. कृष्णा गुप्ता, योगेश गोरखे, प्रणय किंजले आदींनी पंच म्हणून काम केले.

रंजन गुप्ता (बिहार), बलवंत साळुंके व धर्मेश यशलहा (मध्य प्रदेश), देवानंद पांडे (झारखंड), राजिंदर देसवाल (हरयाणा), अमितकुमार राणा (उत्तराखंड), शैलेश गवळी, विजय म्हस्के, अमित वेंगुर्लेकर, नितिन सेठी, राजेश वाघमारे (महाराष्ट्र) यांच्यासह सिक्कीम, केरळ, पुडुचेरी आदी राज्यांचे संघटक उपस्थिती होते.

सुवर्णपदकाची हॅट्रीक

मध्यप्रदेशच्या शुभी व्यासने सलग तीन वर्ष सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला. अनुभवी शुभी हीने 2015 (पानिपत) आणि 2014 (मुंबई)तही सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या तीन वर्षांपासून ती सातत्याने चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत असून यापुढेही ती खेळात सातत्य ठेवेल, अशी अपेक्षा आहे.

आंतराराष्ट्रीय खेळाडू

महाराष्ट्राची राजधानी मुंबईचे मनिष राव आणि अतुल एडवर्ड हे दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेचे आकर्षण होते. मनिष रावने 2015 मध्ये माद्रिद(स्पेन) येथील स्पर्धेत पदक जिंकलेले आहे. तर अतुल एडवर्डने 2014 मध्ये नेदरलँड इथून सुवर्णपदक जिंकून आणले होते. मनिष पुरुष दुहेरीत तर अतुल मिश्र दुहेरी गटातून आपल्या जोडीदारांसह खळले. त्यांच्या खेळ पाहण्यासाठी सर्वचजण उत्सुक होते. या दोन्ही आंतराराष्ट्रीय खेळाडुंचा राजस्थान राज्य क्रीडा परिषदेचे सचिव नारायण सिंह यांच्या हस्ते राजस्थानी पगडी बांधून व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

थ्री स्टेट्स

तीन नव्या राज्यांचे संघ चौथ्या राष्ट्रीय वरिष्ठ पिकलबॉल स्पर्धेत प्रथमच सहभागी झाले. केरळ, सिक्कीम आणि उत्तराखंड. या राज्यांचे खेळाडू नवखे होते, तरीही त्यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच या खेळाडुंच्या काही सामन्यांनी अनेकांचे लक्ष वेधले. या तीन संघांच्या सहभागने या स्पर्धेत केवळ खेळाडुंची संख्या वाढली नाही तर त्यांचा खेळ, भाषा, संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन झाले.

 

विजेते खेळाडू :

पुरुष एकेरी

निखील सिंग राजपूत (राजस्थान)

अनिकेत दुर्गावले (महाराष्ट्र)

कमल गुप्ता (पिंक सिटी जयपूर)

 

महिला एकेरी

शुभी व्यास (मध्य प्रदेश)

रेखा चौधरी (राजस्थान)

प्रतिक्षा बावडेकर (महाराष्ट्र)

 

पुरुष दुहेरी

मनिष राव व भूषण पोतनिस (महाराष्ट्र)

भारत राज शर्मा व प्रशांत कलानी (राजस्थान)

आनंद सिंग व अभय कुमार (बिहार)

 

महिला दुहेरी

करिष्मा कालिके व ऋतुजा कालिके (महाराष्ट्र)

मधुलिका चौधरी व गरीमा गौर (राजस्थान)

शिवानी सोनी व उर्मिला आझाद (मध्य प्रदेश)

 

मिश्र दुहेरी

अतुल एडवर्ड व नताशा (महाराष्ट्र)

अश्विनी कुमार वाधवा व कविता शेखावत (राजस्थान)

नीरज शर्मा व मेघा कपूर (पिंक सिटी जयपूर)

 

कोणत्या राजांचा सहभाग?

राजस्थान

पिकं सिटी जयपूर

महाराष्ट्र

मध्यप्रदेश

हरयाणा

बिहार

झारखंड

पुडुचेरी

सिक्कीम

केरला

उत्तराखंड

 

 

 

 

 

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Visitors

  • 5,492

Categories

Top Clicks

  • None

Social

December 2016
M T W T F S S
« Nov   Jan »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 494 other followers

Social

%d bloggers like this: