पहिली महापौर चषक स्पर्धा धुमधडाक्यात

Leave a comment

December 21, 2015 by Pickleball Times

IMG_4085

तन्विता ठाकूर

IMG_4011

स्वप्नाली आगरे

मुंबई – अंधेरीतील प्रसिद्ध शहाजी राजे क्रीडा संकुल, त्यातील टेनिस कोर्ट, मुंबई, नवी मुंबई आणि वसईतल्या एकूण ३६ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून आलेले ६ ते १९ वर्ष वयोगटातले सुमारे १०० खेळाडू, त्यांच्यातील सळसळता उत्साह आणि ऊर्जा, अंतिम सामन्यांमध्ये रंगलेल्या लढती आणि प्रत्येक गुणावर मिळणारी टाळ्यांची उत्स्फुर्त दाद, हेच चित्र शनिवार, ५ डिसेंबर २०१५ रोजी पार पडलेल्या पहिल्या पिकलबॉल महापौर चषक स्पर्धेत पाहावयास मिळाले.

मुंबई महानगरपालिकेने ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन आणि मुंबई सबब डिस्ट्रिक्ट पिकलबॉल असोसिएशनच्या सहकार्याने या पहिल्या-​वहिल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात केले होते. त्यात तब्बल ३६ शाळांना सहभाग नोंदवला. पिकलबॉल या नव्या खेळाच्या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही एवढ्या शाळांनी आपले जवळपास १०० खेळाडू स्पर्धेला पाठवले. कदाचित हा एक विक्रमच असावा. जवळपास सर्वच खेळाडू पिकलबॉलची स्पर्धा प्रथमच खेळत होते. पण तरीही संपूर्ण स्पर्धेदरम्यान तसे कुठे जाणवत नव्हते. अनेकजण सराईत खेळाडुंसारखे खेळत होत, हे या स्पर्धेचे मोठे यश म्हणावे लागेल.

IMG_4011

स्वप्नाली आगरे

गोरेगाव(पू)च्या रायन इंटरनॅशनल स्कूलने १७ गुण घेऊन स्पर्धेचे सर्वसाधारण सांघिक विजेतेपद पटकावले. रायन स्कूलच्या तन्विता ठाकूरने मुलींच्या एकरी गटाचे विजेतेपद जिंकले. तिने गोरेगाव(पू)च्या डाहाणूकर महाविद्यालयाच्या अनुभवी स्वप्नाली आगरे हिला अटितटीच्या सामन्यात पराभूत केले.

मुलींच्या दुहेरी गटाच्या अंतिम सामन्यात गोरेगावस्थित संमित्र विद्यामंदीरच्या ईशा सकपाळ व भक्ती आडीवरेकर यांनी रायन स्कूलच्या इशिता सिंग व पलक भंडारी यांच्यावर विजय मिळवला.

मुलांच्या एकेरीत गटाच्या अंतिम सामन्यात जमनाबाई नरसी स्कूलच्या कथन गांधीने आपल्याच शाळेच्या शनय मेहताला नमवून विजेतेपद खिशात घातले. शनय मेहता हा स्पेनमधली आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे कांस्य पदक विजेता खेळाडू आहे. त्यामुळे त्याला पराभूत करुन कथनने सर्वांनाच धक्का दिला.

IMG_4218

विनायक बेलकर व संकेश तरळ

मुलांच्या दुहेरी गटात अंधेरीतल्या परांजपे शाळेच्या साहिल सूर्यवंशी व साहिल खंडागळे यांनी दिक्षित रोड शाळेच्या विनायक बेलकर व संकेश तरळ यांना पराभूत करुन अजिंक्यपद पटकावले.

IMG_3860

स्वप्नील टेंबलकर

गोरेगावच्या नगरसेविका वर्षा टेंबलकर आणि त्यांचे पती स्वप्नील टेंबलकर यांच्या हस्ते स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाले. तर स्पर्धेचे बक्षीस वितरण पेठे ज्वेलर्सचे अतुल पेठे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शहाजी राजे क्रीडा संकुलाचे श्री चव्हाण आणि श्री गोडांबे यांनीही स्पर्धेला भेट दिली. संकुलात चालणाऱ्या पिकलबॉल खेळाला आम्ही नेहमीच पाठिंब दिलेला असून तो यापुढेही कायम राहिल, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले.

IMG_4043

शहाजी राजे क्रीडा संकुलाचे अधिकरी श्री गोडांबे

 

IMG_4294

सर्वसाधारण विजेत्या रायन इंटरनॅशनल स्कूलचा संघ महापौर चषकासह. सोबत क्रीडा शिक्षिका रुपाली मोरे.

IMG_4275

ईशा सकपाळ व भक्ती आडीवरेकर

या स्पर्धेला ‘आयपा’चे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर, नॅशनल गव्हर्निंग कौन्सिलचे मनिष दाभोळकर, मुंबई सबब डिस्ट्रिक्ट पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अमित वेंगुर्लेकर, सचिव चेतन काते, नवी मुंबई पिकलबॉलचे संघटक राजेश वाघमारे, ग्लॅमशॅम डॉट कॉमचे नितीन सेठी, भाविक शाह, उद्योजक अनिश शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.

IMG_4286

कथन गांधी यास पदक प्रदान करताना अतुल पेठे

राहूल वाणी, कृष्णा केसरकर, रुपाली मोरे, निकिता भुवड, अमेय कुलकर्णी, जयेश सूर्याजी, अंकिता बालेकर, कादंबरी पाटील, कुणाल बारे, आशिष महाजन आदींनी कोर्टवरील सामान्यांचे आयोजन आणि पंच म्हणून काम केले.

स्पर्धेला ओमटेक्स, स्पार, ग्लॅमशॅम डॉट कॉम आणि पिकल एण्टरटेणन्मेण्ट यांचे प्रायोजकत्व मिळाले होते.

 

या शाळांनी सहभाग नोंदवला

 • रायन इंटरनॅशनल स्कूल, गोरेगाव(पू)
 • सेण्ट झेवियर्स हायस्कूल, गोरेगाव(पू)
 • जे.ई.एस.सेकण्डरी स्कूल, मुलुंड(पू)
 • सौ.लक्ष्मीबाई इंग्लिश मेडियम स्कूल, मुलुंड(पू)
 • सेण्ट थॉमस हायस्कूल, गोरेगाव(पू)
 • एच.व्ही.बी. अॅकेडमी, मरीन लाइन्स
 • दिक्षित रोड म्युनसिपल स्कूल, विले पार्ले(पूर्व)
 • संमित्र मंडळ विद्यामंदीर, गोरेगाव(पू)
 • जमनालाल नरसी पॉलिटेक्निकल स्कूल, विले पार्ले(प)
 • जमनाबाई नरसी स्कूल, विले पार्ले(प)
 • जी.पी.एम. कॉलेज, विले पार्ले(पू)
 • माधवराव भागवत हायस्कूल, विले पार्ले(पू)
 • श्रीछत्रपती शिवाजी विद्यालय, विले पार्ले(पू)
 • जी.एम.ई.एस. हायस्कूल, विले पार्ले(पू)
 • पार्ले टिळक विद्यालय, विले पार्ले(पू)
 • एम.एल. डहाणुकर कॉलेज, विले पार्ले(पू)
 • श्री.एन.पी.के.टी. विद्यामंदीर, विले पार्ले(पू)
 • एअरपोर्ट हायस्कूल, विले पार्ले(पू)
 • साठे कॉलेज, विले पार्ले(पू)
 • इकोल मॉण्डियल वर्ल्ड स्कूल, विले पार्ले(प)
 • सुंदरबाई सामंत स्कूल, अंधेरी(पू)
 • परांजपे विद्यालय, अंधेरी(पू)
 • हॉली फॅमिली हायस्कूल, अंधेरी(पू)
 • शेठ एम.ए. हास्कूल, अंधेरी(प)
 • भवन्स कॉलेज, अंधेरी(प)
 • एम.व्ही.एम. कॉलेज, अंधेरी(प)
 • पॅट्रीक टेक्निकल ज्युनिअर कॉलेज, अंधेरी(प)
 • सेण्ट टेरेसा हायस्कूल, सांताक्रुज(प)
 • पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, नवी मुंबई
 • दिल्ली पब्लिक स्कूल, नेरूळ, नवी मुंबई
 • एस.एस.हायस्कूल अॅण्ड ज्यु.कॉलेज, सीवूड, नवी मुंबई
 • नवी मुंबई महानगरपालिक शाळा, क्र…., नवी मुंबई
 • सेण्ट पीटर स्कूल, वसई
 • विद्या विकास महाविद्यालय, वसई
 • ……………………………
 • ……………………….

 

 • IMG_3839
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Visitors

 • 5,492

Categories

Top Clicks

 • None

Social

December 2015
M T W T F S S
« Nov   Jan »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 494 other followers

Social

%d bloggers like this: