महाराष्ट्राने पानिपत जिंकले

Leave a comment

August 4, 2015 by Pickleball Times

Winner Team

विजेता महाराष्ट्र संघ

ऐतिहासिक पानिपत शहरातील शिवाजी स्टेडियममध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतपद महाराष्ट्राने जिंकले. दहा राज्यांमधून आलेल्या खेळाडुंच्या विविध गटातल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडुंनी एकूण १२० गुणांची कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेच्या या चषकावर आपले नाव कोरले. मुंबईच्या संघानेही चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले, मात्र त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

IMG_2826

पुरुष एकेरीचा अंतिम सामना सुरु करताना पानिपतचे महापौर सुरेश वर्मा, हरियाणा पिकलबॉल असोसिएशनचे प्रेसिडेण्ट विजेंदर पुनिया, चीफ पॅटर्न बिजेंदर फोर, व्हाइस प्रेसिडेण्ट दिपक खुट्टर, जॉइण्ट सेक्रेटरी दिपेंदर सिंग

ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशने हरियाणा पिकलबॉल असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली होती. इंडियन ऑइल स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. २६ ते २८ जून दरम्यान झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, मुंबई, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पाँडेचरी, दादर नगर हवेली, दिल्ली या राज्यांचे खेळाडू सहभागी झाले होते.  पहिल्या दिवशी काही खेळाडुंना बाय मिळाला तर काहींना खूप संघर्ष करावा लागला. दुसऱ्या दिवशी बाद फेऱ्या जिंकून उपांत्य फेरीत पोहचलेल्या खेळाडुंनी अंतिम फेरीत जाण्यासाठी खूप धडपड केली. त्यामुळे अनेक सामने रंगतदार तर अनेक थरारक झाले. तिसऱ्या दिवशी दिवसाच्या सत्रांमध्येही अंतिम सामन्यांबद्दल खूप उत्सुकता होती. दुपारनंतर विविध गटांमधील अंतिम सामने रंगू लागले.

Ankita & Sonawali

महिला दुहेरीच्या उपविजेत्या अंकिता बालेकर व सोनावली जाधव (मुंबई)

सर्वप्रथम महिला दुहेरीचा अंतिम सामना झाला. महाराष्ट्राच्या ऋतुजा कालिके व इशा एच या जोडीने महाराष्ट्राच्या अंकिता बालेकर व सोनावली जाधव यांच्यावर १२-१० आणि १२-१२ अशा फरकांनी दोन सेट जिंकून विजय नोंदवला. मिश्र दुहेरीत महेश परदेशी व गरिमा जवाहर(महाराष्ट्र) यांनी करणसिंग शेखावत व कविता शेखावत (राजस्थान) यांच्यावर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या खेळाडुंनी ११-० आणि ११-४ असा खेळ करुन प्रतिस्पर्ध्यांना झुंज करण्याची संधीच नाही दिली.

MD Winner

पुरुष दुहेरीचे विजेत भरतराज व मुख्त्यार अली (राजस्थान)

Manish & Sachin

पुरुष दुहेरीचे उपविजेते मनिष राव व सचिन मांद्रेकर (मुंबई)

पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्याबद्दल सर्वांनाच खूप उत्सुकता होती. कारण या सामान्यात गतवर्षीची विजेती जोडी भरतराज शर्मा व मुख्त्यार अली(राजस्थान) आणि मनिष राव व सचिन मांद्रेकर(मुंबई) हे अनुभवी खेळाडू एकमेकांना भिडणार होते. मनिष व सचिन यांनी चांगला खेळ करुन पहिला सेट सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये भरतराज व मुख्त्यार अली यांनी आपल्या चुका टाळून स्वतःचा खेळ सुधारला आणि दुसरा सेट जिंकला. दोन्ही जोड्यांनी एक-एक सेट जिंकल्याने तिसऱ्या सेटमध्ये खूपच चुरस निर्माण झाली. भरतराज व मुख्त्यार यांनी आपला सुधारीत आपला खेळ कायम ठेवला. मनिष व सचिनही आपला खेळ सुधारण्यासाठी प्रयत्न करत होते. दोन्ही बाजुंचे खेळाडू एक-एक गुणासाठी संघर्ष करत होते. शेवटचा सेट जो जिंकेल तो अंतिम सामनाही जिंकणार होता. त्यामुळे उपस्थित सर्वचजण श्वास रोखून खेळ बघत होते. वातावरणात एक प्रकाराचा तणावही निर्माण झाला होता. पण शेवटच्या क्षणांमध्ये राजस्थानच्या भरतराज व मुख्त्यार यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत पुरुष दुहेरीचे विजेतेपद अक्षरशः खेचून आणले.

Jagruti Jaware

महिला एकेरीची उपविजेती जागृती जवारे (महाराष्ट्र)

Shubhi Vyas

महिला एकेरीची ​विजेती शुभी व्यास (मध्यप्रदेश)

गतवर्षी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेची विजेती शुभी व्यास (मध्यप्रदेश) हीने यंदाही महिला एकेरीचे विजेतेपद कायम ठेवले. तिला महाराष्ट्राच्या जागृती जवारे हिने चांगली टक्कर दिली. पण​ तिचे प्रयत्न कमी पडले आणि शुभीचे विजेतेपद निश्चित झाले. मुंबईच्या एकता सकपाळ हिच्यावर मात करुन महाराष्ट्रच्या अदिती जगताप तिसऱ्या स्थानावर राहिली.

Atharva

पुरुष एकेरीचा विजेता अथर्व सी(महाराष्ट्र)

Krushna

परुष एकेरीचा उपविजेता कृष्णा (दादरा नगर हवेली)

Ashish

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या स्थानावर राहिलेला आशिष महाजन (मुंबई)

पुरूष एकेरी सामाना रंगतदार झाला. अथर्व सी(महाराष्ट्र) आणि कृष्णा (दादरा नगर हवेली) हे समान तुल्यबळ असलेले खेळाडू एकमेकांसमोर होते. दोन्ही खेळाडू तरुण आणि तरतरीत असल्याने दोघांच्याही खेळात चपळाई होती. आपल्या कोर्टात आलेला चेंडू परतवताना प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याचा दोघंही प्रयत्न करत होते. त्यामुळे दोघांच्याही खेळात आक्रमकता दिसून येत होती. अथर्व आणि कृष्णाने एक-एक सेट जिंकल्याने तिसऱ्या सेटमधली चुरस वाढली होती. पण शेवटी अथर्वने अधिक अचूक फटके मारुन तिसरा सेट खिशात घालत विजेतेपद पटकावले. पुरूष एकेरीत मुंबईच्या आशिष महाजनने अजय रावत(मध्य प्रदेश)वर मात करुन तिसरा क्रमांक मिळवला.

WD Winner

महिला दुहेरीच्या विजेत्या ऋतुजा कालिके व इशा एच (महाराष्ट्र)

Mix D winner

मिश्र दुहेरीचे विजेते महेश परदेशी व गरिमा जवाहर (महाराष्ट्र)

पानिपतचे नूतन महापौर सुरेश वर्मा यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रं आणि बक्षिसे देण्यात आली. ऑफ इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर, हरियाणा पिकलबॉल असोसिएशनचे प्रेसिडेण्ट विजेंदर पुनिया, चीफ पॅटर्न बिजेंदर फोर, व्हाइस प्रेसिडेण्ट दिपक खुट्टर, जॉइण्ट सेक्रेटरी दिपेंदर सिंग, पानिपत ​​डिस्ट्रिक्ट पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कपिल राठी, राजिंदर देसवाल उपस्थित होते.

Kapil Rathi

तिसऱ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेच्या व्यासपीठावरुन बोलताना पानिपत डिस्ट्रिक्ट पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कपिल राठी

तीन दिवसांच्या या राष्ट्रीय स्पर्धेला ‘आयपा’चे जॉइण्ट ट्रेझरर समीर दिक्षीत, नॅशनल गव्हर्निंग कौ​न्सिलचे अध्यक्ष सुशांत जोशी, ‘दूरदर्शन’चे गणेश अय्यर ‘फिफ्थ क्वॉर्टर इन्फोमिडिया प्रा.लि.’चे नितिन सेठी यांनीही हजेरी लावली. या स्पर्धेत करणसिंग शेखावत(राजस्थान), देवानंद पांडे(झारखंड), रंजन गुप्ता(बिहार), धर्मेश यशलाहा(मध्य प्रदेश), निकम(महाराष्ट्र), राजेश वाघमारे(नवी मुंबई) आदी सहभागी झाले होते.

Officials

‘आयपा’ची ऑफिशियल टीम : चेतन काटे, राहुल वाणी, कृष्णा गुप्ता, कृष्णा केसरकर, जयेश सूर्याजी, अमेय कुलकर्णी, रुपाली मोरे, प्रणय किंजळे, योगेश गुरखे, स्वप्नाली आग्रे

कृष्णा गुप्ता, कृष्णा केसरकर, जयेश सूर्याजी, अमेय कुलकर्णी यांनी पंच म्हणून काम केलं तर राहुल वाणी, चेतन काटे, रुपाली मोरे, निकिता भुवड, प्रणय किंजळे, योगेश गुरखे, स्वप्नाली आग्रे यांनी कोर्टावरील व्यवस्थापन करण्याचे महत्त्वाचे काम केले.

IMG_2776 Doordarshan

Rajsthan

टीम राजस्थान

Pondichory

टीम पॉण्डिचरी

Mumbai

टीम मुंबई

MP Team

टीम मध्य प्रदेश

MP & Bihar

मध्य प्रदेश पिकलबॉल असोसिएशनचे धर्मेश यशलाहा(मभागी), बिहार पिकलबॉल असोसिएशनचे रंजन गुप्ता(उजवीकडे)

Jharkhand Team

टीम झारखंड

IMG_2338

बिहारच्या खेळाडुंची ओळख करुन घेताना राजिंदर देसवाल. सोबत सुनील वालावलकर व दिपेंदर सिंग

IMG_2031

हरियाणा पिकलबॉल असोसिएशनचे प्रेसिडेण्ट विजेंदर पुनिया यांना आयपाची वॉल क्लॉक भेट देताना ऑफ इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर

Bihar Team

टीम बिहार

IMG_2301 IMG_2055

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Visitors

  • 5,492

Categories

Top Clicks

  • None

Social

August 2015
M T W T F S S
« Jul   Sep »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 494 other followers

Social

%d bloggers like this: