मुंबईच्या पिकलबॉल स्पर्धेत उत्साह, वेग आणि थरार !

Leave a comment

June 12, 2015 by pickleball times

बई पिकलबॉल खुल्या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडुंसह शहाजी राजे क्रीडा संकुलाचे मुख्य अधिकारी विनायक गोडांबे, मनीष दाभोळकर, ज्येष्ठ प्रशिक्षक व्यंकट अय्यर, ‘पॅशन ग्रुप’चे कृष्णकुमार व नितीन चारी आणि ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर.

मुंबई पिकलबॉल खुल्या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडुंसह शहाजी राजे क्रीडा संकुलाचे मुख्य अधिकारी विनायक गोडांबे, मनीष दाभोळकर, ज्येष्ठ प्रशिक्षक व्यंकट अय्यर, ‘पॅशन ग्रुप’चे कृष्णकुमार व नितीन चारी आणि ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर.

अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्समधले नवे कोर्ट, दहा ते पन्नास वयोगटातले शंभर खेळाडू, स्त्री-पुरुष गटात रंगलेले चुरशीचे सामने, सिंगल आणि डबल्सच्या विजेतेपदसाठी धडपड, प्रतिस्पर्ध्यांवरची आक्रमणे-प्रतिआक्रमणे, त्यातली चपळाई, वेगवान खेळ आणि त्यातून निर्माण झालेला थरार… तिसऱ्या मुंबई उपनगर पिकलबॉल खुल्या स्पर्धेची ही काही क्षणचित्रं. २३, २४ व ३१ मे रोजी आयोजित ही स्पर्धा देशातल्या पहिल्या पिकलबॉल कोर्टवर पार पडली आणि भारतीय पिकलबॉल खेळाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली.

पुरुषांच्या दुहेरी गटातील ​विजेते मनिष राव व सचिन मांद्रेकर.

पुरुषांच्या दुहेरी गटातील ​विजेते मनिष राव व सचिन मांद्रेकर

मुंबई उपनगर पिकलबॉल संघटनेने ‘पॅशन ग्रुप’च्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली होती. २३ व २४ मे रोजी विविध फेऱ्यांमधले सामने खेळवण्यात आले. ३१ मे रोजी अंतिम सामने ठेवण्यात आले होते. मुंबईतले सुमारे १०० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात नवी मुंबईच्या दोन खेळाडुंचाही समावेश होता. महिला व पुरुषांच्या एकेरी, दुहेरी आणि मिश्र गटातले अनेक सामने अटितटीचे झाले. एकेरीत अनिकेत दुर्गावळीने विविध फेऱ्यांमधल्या प्रतिस्पर्धी खेळाडुंवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. शेवटच्या फेरीत त्याने आशिष महाजनवर मात करुन एकेरीचे विजेतेपद पटकावले. महिला गटात एकता सपकाळने कादंबरी पाटील हिला मात देऊन स्वतःचे विजेतेपद निश्चित केले.

पुरुषांच्या दुहेरी गटातील उपविजेते भूषण पोतनीस व आशुतोष मडभावी.

IMG_1733

शबनम भूषण

पुरुषांच्या दुहेरी गटात मनिष राव व सचिन मांद्रेकर विरुद्ध भूषण पोतनीस व आशुतोष मडभावी यांच्यात अटीतटीचा सामना झाला. एक ते दीड तास रंगलेल्या या सामन्यात दोन्ही जोड्यांनी एक-एक सेट ११-८ व ५-११ अशा गुणांनी जिंकला होता. त्यामुळे तिसरा सेट जिंकण्यासाठी दोन्ही बाजुंनी जोरदार संघर्ष झाला. पण शेवटी मनिष व संचित या जोडीने तिसरा निर्णायक सेट ११-५ अशा फरकाने जिंकून विजय अक्षरशः खेचून आणला. महिला दुहेरीत प्रीती गुप्ता व अंकिता बालेकरने भाग्यश्री भंडारी व सोनावली जाधव यांना मात दिली. मि​श्र गटात ​अनिकेत दुगावळी व भाग्यश्री भंडारी यांनी विजय नोंदवला. कुणाल बारे व शबनम भूषण यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सोनावली जाधव

सोनावली जाधव

IMG_1684

सिया साळुंके

शहाजी राजे क्रीडा संकुलाचे मुख्य अधिकारी विनायक गोडांबे, मनीष दाभोळकर, ज्येष्ठ प्रशिक्षक व्यंकट अय्यर, ‘पॅशन ग्रुप’चे कृष्णकुमार व नितीन चारी आणि ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली.

या स्पर्धेत प्रथमच नवी मुंबईतून दोन खेळाडू सहभागी झाले होते. सिया साळुंके(९) आणि अंश अग्रवाल(१२) यांनी आपापल्या सामन्यात चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. पिकलबॉल संघटक समीर राऊत(मुंबई) व राजेश वाघमारे(नवी मुंबई) हेसुद्धा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आवर्जून उपस्थित होते.

IMG_1761

आशिष महाजन

IMG_1754

अंश अग्रवाल

IMG_1703

पंच कृष्णा गुप्ता

IMG_1770मुंबई उपनगर पिकलबॉल संघटनेचे सचिव चेतन काटे यांच्यासह टीमने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. कृष्णा गुप्ता, कृष्णा केसरकर आणि जय सूर्याजी यांनी पंच म्हणून महत्त्वाची भूमिका तर पार पाडलीच, त्याचबरोबर स्पर्धेच्या व्यवस्थापनाचे कामही केले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Visitors

  • 4,985

Categories

Top Clicks

  • None

Social

June 2015
M T W T F S S
« May   Jul »
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 449 other followers

Social

%d bloggers like this: