‘स्पोर्टिंग लायन्स फिएस्टा २०१५’

Leave a comment

April 30, 2015 by Pickleball Times

IMG_1358

पिकलबॉल स्पर्धेच्या पहिल्या मॅचचा टॉस करताना लायन्स क्लबचे अध्यक्ष द्वितीय. सोबत लायन्सचे पदाधिकाऱ्यांसह ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर व महाराष्ट्र पिकलबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी शैलेश गवळी, ज्येष्ठ प्रशिक्षक व्यंकट अय्यर.

मुंबई : ‘लायन्स क्लब ऑफ बॉम्बे विलिंगडन क्रेसण्ट चॅरिटी ट्रस्ट’च्यावतीने आयोजित ‘स्पोर्टिंग लायन्स फिएस्टा २०१५’ या क्रीडा महोत्सवात प्रथमच समावेश केलेल्या पिकलबॉल स्पर्धेत तब्बल शंभर खेळाडुंनी सहभाग नोंदवला. रात्रीच्या वेळी प्रकाशझोतात खेळवण्यात आलेले अनेक सामने अटीतटीचे झाल्याने ही स्पर्धा चांगलीच रंगली. विशेष म्हणजे अनेक खेळाडू नसलेल्या अनेक हौशी प्रेक्षकांनीही पिकलबॉल आणि रॅकेट हातात घेत कोर्टमध्ये पिकलबॉल खेळाचा आनंद लूटला.

११ एप्रिल ते ३ मे दरम्यान दर शनिवार-रविवारी होणाऱ्या ‘स्पोर्टिंग लायन्स फिएस्टा २०१५’मध्ये सुमारे आठ ते दहा खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात शाळा-महाविद्यालयीन खेळाडुंसह व्यावसायिक व हौशी खेळाडूंना प्रवेश देण्यात आला होता. लायन्स म्युनसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मिलन सबवे, सांताक्रुज(प) येथील या महोत्सवात १८ व १९ एप्रिल रोजी पिकलबॉल स्पर्धा झाली. पिकलबॉल क्रीडा प्रकारात सुमारे १०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

IMG_1350मुलांच्या एकेरी स्पर्धेत कृष्णा केसरकर विजेता तर सिद्धार्थ निकाले उपविजेता ठरला. प्रणय किंजाळेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. मुलांच्याच दुहेरी प्रकारात कुणाल बारे व आशिष महाजन विजेते तर अनिकेत दुर्गावली व प्रणय शिरगावकर उपविजेते ठरले.

मुलींच्या एकेरी प्रकारात एकता सकपालने विजेती तर अंकिता बालेकर उपविजेती होण्याचा मान मिळवला. शबनम भूषण व योगिता मांजरेकर या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. मुलींच्या दुहेरी स्पर्धेत अंकिता बालेकर व शबनम भूषण यांनी विजेतेपद मिळवले तर एकता सकपाल व मानसी ताम्हणकर यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

IMG_1397

‘स्पोर्टिंग लायन्स फिएस्टा २०१५’मध्ये बोलताना मुंबई महापालिकेचे अधिकारी माळी. सोबत ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर व महाराष्ट्र पिकलबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी शैलेश गवळी.

‘स्पोर्टिंग लायन्स फिएस्टा २०१५’चे उद्घाटन आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते क्रीडाज्योत पेटवून करण्यात आले. लायन्स क्लबचे प्रेसिडेण्ट द्वितीय, लायन्स म्युनसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सीईओ दिनेश नायर, ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते समीर दलवाई, नवी मुंबई महापालिकेचे क्रीडा अधिकारी माळी, ज्येष्ठ प्रशिक्षक व्यंकट अय्यर, लायन्स क्लबचे कोषाध्यक्ष व्यंकटेश, सुदर्शन, हुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

IMG_1478 पिकलबॉल स्पर्धेला राज्यातल्या विविध भागातले खेळाडू आणि क्रीडा संघटक आले होते. त्यात महाराष्ट्र स्टेट पिकलबॉल असो​सिएशनचे सेक्रेटरी शैलेश गवळी यांच्यासह विजय म्हस्के(अहमदनगर), अशोक निकम(जळगाव), सचिन (पुणे), समीर राऊत(मुंबई), चेतन काटे(मुंबई उपनगर), राजेश वाघमारे(नवी मुंबई), भूषण जाधव(औरंगाबाद) यांचा समावेश होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल पुजारी, अमेय कुलकर्णी, जय सूर्याजी, रुपाली मोरे(मुलुंड), माधवी(बदलापूर), विनोद(अंबरनाथ), राहुल वाणी यांनी विशेष प्रयत्न केले.

IMG_1493या स्पर्धेदरम्यान अनेक मुले, मुली, महिला आणि पुरुषांनी पिकलबॉल खेळ खेळून बघितला. त्यात दाऊदी बोहरा समाजाच्या व्यापाऱ्यांचाही समावेश होता. या सर्वांसाठीच हा खेळ नवा होता, तरी तो खेळताना त्यांना मजा आली. या खेळाचा प्लॅस्टिक बॉल हलका असल्याने तो टेबल टेनिससारखा आकार असलेल्या मोठ्या पॅडलने सहज टोवलवता आला. त्यामुळे नेटच्या पलिकडे जाणारा बॉल बघून आम्ही पिकलबॉल खेळ खूप एन्जॉय केला, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

IMG-20150421-WA0002

पिकलबॉल स्पर्धेच्या विजेत्यांसह लायन्स क्लब आणि पिकलबॉल असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी.

IMG_1375

पिकलबॉल खेळताना सत्तर वर्षीय ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व्यंकट अय्यर.

IMG_1437 IMG_1429IMG_1415 IMG_1482

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Visitors

  • 5,492

Categories

Top Clicks

  • None

Social

April 2015
M T W T F S S
« Mar   May »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 494 other followers

Social

%d bloggers like this: