नवी मुंबईकरांना मिळाला नवा हॅपिनेस

Leave a comment

April 9, 2015 by Pickleball Times

Exif_JPEG_420

नवी मुंंबई महानगरपालिकचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि सहाय्यक आयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांंना पिकलबॉल खेळाची माहिती देताना सुनिल वालावलकर

टाइम्स ऑफ इंडियाचे रिपोर्टर आणि हॅपी स्ट्रीटचे को-ऑर्डिनेटर बी.बी. नायक यांचा सत्कार करताना सुनील वालवलकर.

टाइम्स ऑफ इंडियाचे रिपोर्टर आणि हॅपी स्ट्रीटचे को-ऑर्डिनेटर बी.बी. नायक यांचा सत्कार करताना सुनील वालावलकर.

नवी मुंंबई – १ फेब्रुवारी २०१५ रोजी नवी मुंबईत एक नवा खेळ लाँच झाला. तो नवखा होता तरी नवी मुंबईकरांनी तो खूप एन्जॉय केला. कारण तो समजायला, शिकायला आणि खेळायलाही सोपा होता. नागरिकांच्या पुढकाराने सुरु झालेल्या आणि टाइम्स ऑफ इंडिया संचलित ‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमात हा नवा खेळ सहभागी झाला होता. विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सरचिटणीस प्रो.वर्षा भोसले यांच्यासह तब्बल ५०० हून अधिक नवी मुंबईकरांनी तो खेळ खेळला आणि त्या खेळाचं नाव होतं पिकलबॉल.

DSC_1981‘हॅपी स्ट्रीट’ अंतर्गत मुख्य पामबिच रोडवर नवी मुंबईच्या नागरिकांनी आपापले आवडते खेळ खेळून धम्माल केली. दर रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत भर रस्त्यावर खेळण्याची मुभा होती. टाइम्स ऑफ इंडिया संचलित या उपक्रमाला नवी मुंबई वाहतूक पोलिस आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे पूर्ण सहकार्य होते. त्यात लोकांनी वझिरानी स्पोर्ट्स अॅकॅडमी ते टीएस चाणक्य सिग्नल दरम्यानचा पामबिच रोडचा वापर खेळण्यासाठी केला. म्हणजे दर रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत पामबिचचा एका बाजुचा मार्ग हा मैदानात रुपांतरीत होत असे. अनेक खेळांसह ‘हॅपी स्ट्रीट’ सुरु झाला. त्यानंतर काही आठवड्यांनी पिकलबॉलने त्यात प्रवेश केला. नवी मुंबईत पिकलबॉल लाँच करण्यासाठी राजेश वाघमारे यांनी पुढाकार घेतला आणि त्यासाठी त्यांना ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रटरी सुनिल वालावलकर यांनी प्रेरीत केले. सुनिल वालावलकर यांनी केवळ प्रेरणा देण्याचेच काम केले नाही तर ते स्वतः अमेय कुलकर्णी, जय सूर्याजी, राहूल पुजारी या टीमसह गोरेगावहून सॅटेलाइट सिटी नवी मुंबईत दाखल झाले.

Exif_JPEG_420‘हॅपी स्ट्रीट’मधल्या आपल्या पहिल्या रविवारपासूनच पिकलबॉलने लोकांना आकर्षित करायला सुरुवात केली. या खेळाचे नाव काय? त्याचे नियम काय? हा कसा खेळला जातो? त्याचं कोचिंग कुठे उपलब्ध आहे? आदी प्रश्न लोकांनी विचारू लागले. नुसती विचारणा करुन ते थांबले नाहीत तर हातात पॅडल घेऊन त्यांनी नेटच्या पलिकडे बॉल टोलवून अनेकांनी पिकलबॉलमध्ये रस दाखवला. हा खेळ खेळण्यात शाळकरी मुलांची संख्या अधिक होती. पामबिचवरील एनआरआय कॉम्प्लेक्सची रहिवासी आणि डीपीएसची विद्यार्थीनी सिया साळुंके ही त्यापैकीच एक. ‘हॅपी स्ट्रीट’मधल्या सहाही आठवडे सिया पिकलबॉल खेळली. तिचे वडिल डॉ. राहुल साळुंके यांच्या माहितीनुसार ती त्यांच्याकडे दर आठवड्याला पिकलबॉल खेळण्याचा हट्ट धरायची. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने पिकलबॉलला शालेय खेळ म्हणून नुकतीच मान्यता दिलेली असून हा खेळ शासनाच्या यादीवर आलेला आहे.

Exif_JPEG_420

महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सरचिटणीस प्रो.वर्षा भोसले यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करताना राजेश वाघमारे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि सहाय्यक आयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनीही ‘हॅपी स्ट्रीट’मधल्या पिकलबॉल कोर्टला आवर्जून भेट दिली आणि पिकलबॉल खेळाची चव चाखली. हा नवा खेळ दोन्ही आयुक्तांना खूप आवडला. ‘हॅपी स्ट्रीट’च्या सहा आठवड्यांपैकी एका रविवारी ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन होता. हा दिवस पिकलबॉल प्रेमींनी ‘लेट्स पिकल ऑन द ग्राउण्ड’ हा इव्हेण्ट घेऊन उत्साहात साजरा केला. त्या दिवशी केवळ महिलांनाच पिकलबॉल खेळायला दिला. पिकलबॉल हा महिलांसाठी अतिशय उपयुक्त असा खेळ आहे. अनेक महिला आणि मुलींनी ‘लेट्स पिकल ऑन द ग्राउण्ड’मध्ये सहभागी होऊन पिकलबॉलचा आनंद लूटला. महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सरचिटणीस प्रो.वर्षा भोसले यांनीही या इव्हेण्टला खास हजेरी लावून सर्व महिलांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी सिव्हिल इंजिनिअर अरुणा पाटील उपस्थित होत्या.

Exif_JPEG_420‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमा दरम्यान ५०० हून अधिक नवी मुंबईकरांची भेट पिकलबॉलशी झाली. जीपीओमधील अधिकारी कुणाल पाटील, सेल्स टॅक्सचे असिस्टण्ट कमिशनर जीवन निर्मळ, रोटरी क्लब ऑफ सॅटेलाइट सिटी नवी मुंबईच्या मेम्बर मंगला घोरपडे, स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या संगीता सराफ, वृक्षप्रेमी कार्यकर्ते आबा रणवरे, फैज अहमद, नितिन, अभिषेक रणवरे, प्रणील पाटील, मानस गुप्ता, अभिषेक तिवारी, रामराव आदिक इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी चेतन अट्टार्डे, कल्पिता मालवणकर, पूजा पाटील, श्वेता तिवारी, हर्ष प्रकाश, शाज, चिन्मय बैतुले, तन्मय बैतुले यांनी नियमितरित्या पिकलबॉल सेशन्सला हजेरी लावली.

Exif_JPEG_42011011432_10153109118219795_1265255194231629117_nExif_JPEG_420

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Visitors

  • 5,492

Categories

Top Clicks

  • None

Social

April 2015
M T W T F S S
« Mar   May »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 494 other followers

Social

%d bloggers like this: